जिल्ह्यात 957 गावांच्या गावठाणांची होणार मोजणी; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळणार ‘मालकी हक्क’


 

स्थैर्य, कराड, दि.२५: स्वामित्व योजनेंतर्गत प्रत्येक गाव खेड्यातील मिळकतीचे डिजिटायजेशन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकरची कार्यवाही होत असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 957 गावांची निवड करण्यात आली आहे. त्याद्वारे मिळकतींचे पॉपर्टी कार्ड तयार होऊन संबंधितांचा मालकी हक्कही सिद्ध होईल. त्याचबरोबर शासकीय जागेत होणारे अतिक्रमण निघून शासकीय जागाही संरक्षित होणार आहेत. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडेल.

अनेक गावांची गावठाण मोजणी झालेली नाही. त्यामुळे त्या गावांतील मालमत्तांचे नकाशे तयार झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पॉपर्टी कार्डचा उताराच निघत नाही. त्यामुळे त्यांना हक्क सिद्ध करता येत नव्हता. त्याचा विचार करून स्वामित्व हक्क योजनेंतर्गत गावांच्या गावठाणांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणही केले जाईल. केंद्र शासनाच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायत विभाग व भूमी अभिलेख विभागामार्फत गावोगावी ही कार्यवाही केली जाणार आहे. पॉपर्टी कार्ड नसल्याने लोकांची, ग्रामपंचायतींची, शासनाची संबंधित जागांवरील मालकी सिद्ध होत नव्हती. त्याचबरोबर अनेकांना कर्ज काढताना त्या जागांचा उताराच तयार होत नसल्याने कर्जही मिळत नव्हते. मात्र, नव्याने होणाऱ्या या सर्वेक्षणाद्वारे सर्व मालमत्तांचे डिजिटायजेशन करून गावांचे अत्याधुनिक नकाशे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील 957 गावांची निवड करण्यात आली आहे. 

ऋषभ पंत की ऋद्धिमान साहा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुणाला संधी मिळणार; गांगुलीनं दिलं असं उत्तर

ज्या गावांचा सिटी सर्व्हे झालेला नाही, त्यांची मालकी हक्काची अडचण दूर करून त्यांना त्यांच्या हद्दी निश्‍चित करून देणे, गावातील घरे, रस्ते, ग्रामपंचायत, शासनाच्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्‍चित करणे, त्या मिळकतींचा नव्याने नकाशा तयार करणे, शासकीय जागा संरक्षित करणे, त्यांच्या हद्दी निश्‍चित करणे आणि लोकांना त्यांचा हक्क प्रदान करणे आदी कामे त्या अंतर्गत होणार आहेत. त्याचबरोबर ड्रोनद्वारे गावठाण मोजणी करून पॉपर्टी कार्डही देण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाकडून या मोजणीसाठी नमुना नंबर नऊ अद्ययावत करून देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांच्या व शासनाच्या मालकीच्या जागा पॉपर्टी कार्डाला लागणार आहेत. त्यामुळे आता मालकी हक्क सिद्ध करणे शक्‍य होणार आहे. नव्याने गावठाण मोजणी झाल्यावर तयार होणाऱ्या नकाशांचे विश्‍लेषण करून, मिळकतीचे क्षेत्र निश्‍चित करण्यासाठी आणि प्रत्यक्ष चौकशीसाठी संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे. ग्रामपंचायतींच्या विविध करांची आकारणी आपोआप होण्यासाठी संगणक प्रणाली अत्याधुनिक केली जाणार आहे. या संगणक प्रणालीद्वारे विविध करांची वसुली अधिक सोपी होईल. 

सातारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 957 गावांची गावठाण मोजणी होईल. त्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. त्याद्वारे गावातील लोकांच्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे.

कार्यकर्त्यांना गाजरं दाखवावी लागतात, अजित पवारांचा विराेधकांना टोला


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!