वाढेफाट्यानजिक चाकूचा धाक दाखवून रोकड लुटलीदोन युवकांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 


 

स्थैर्य, सातारा, दि.२५:  वाढे फाटा, ता. सातारा येथे रात्री महामार्गावर सेवा रस्त्याकडेला थांबलेल्या पिकअप वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण करून तीन हजारांची रोकड व मोबाईल तिघाजणांनी लुटून नेला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. अधिक अंकुश पवार वय 27 वर्षे, सुयश अशोक जाधव दोघे रा. सैदापूर, ता. सातारा अशी संशयीतांची नावे आहेत तर तर एकजण अल्पवयीन आहे. 

याबाबत माहिती अशी की, दि. 21 रोजी रात्री पुणे-बंगलोर महामार्गावर वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावर एक पिकअप वाहन थांबलेले होते. यावेळी मोटारसायकलवरून तीन अनोळखी युवक तेथे आले. त्यांनी पिकअप वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण करून तीन हजारांची रोकड व मोबाईल फोन घेवून पळून गेले होते. त्याबाबत अविनाश किसन शेळके, रा. बिरोबावस्ती लोणंद यांनी तक्रार दिली होती. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाणेस तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. ही घटना गंभीर असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी तात्काळ गुन्हयाचा तपास करून संबंधित आरोपींना पकडण्याच्या सूचना तालुका पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पो. नि. सजन हकारे यांनी यांनी डी.बी.पथकास मार्गदर्शन व सुचना केल्या. डी.बी. पथकाने कौशल्यपूर्वक माहिती प्राप्त करून एका संशयितास ताब्यात घेतले. संशयिताने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. तथापि, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने दोन साथीदारांसमवेत हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगिले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोन संशयीतांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांनीही गुन्हयाची कबुली दिली आहे. 

गुन्हयातील लुटलेली रोख रक्कम व वापरलेले शस्त्र व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. संशयितांची प्राथमिक कोणतीही माहिती प्राप्त नसताना सातारा तालुका डी.बी. पथकाने कौशल्यपूर्वक माहिती प्राप्त करून हा गंभीर तात्काळ उघड केल्याने वरीष्ठ अधिकारी यांनी सातारा तालुका पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे, उपनिरिक्षक अमित पाटील, डी.बी. पथकातील हवालदार दादा परिहार, पो. ना. सुजीत भोसले, पो. ना. निलेश जाधव, पो. कॉ. सागर निकम, पो. कॉ. सतीश पवार यांनी केली.

जिल्ह्यात 957 गावांच्या गावठाणांची होणार मोजणी; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळणार ‘मालकी हक्क’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!