स्थैर्य,कराड, दि.२५ : महाविकास आघाडीचे सरकार पडणार आहे, असे कार्यकर्त्यांना गाजर दाखवायचे असते. सरकार अस्थीर आहे, म्हणत पक्षातील आमदारांनाही सोबत ठेवायचे असते. तेच काम भाजप करत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे, कार्यकालही पूर्ण करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या 36 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यास उपमुख्यमंत्री पवार येथे आज (बुधवारी) आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्ह्यात 957 गावांच्या गावठाणांची होणार मोजणी; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळणार ‘मालकी हक्क’
श्री. पवार म्हणाले, आमचे नेते शरद पवार यांनी कालच त्याबाबत सुतोवाच केले आहे. जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यावेळी सरकारबाबत त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट भुमिका मांडली आहे. त्यामुळे त्याबाबत आणखी काही वेगळ मत व्यक्त करणे योग्य नाही. त्यांनी माडंलेली भुमिका पक्षाची भुमिका आहे. मात्र तरीही सत्तेवर कोणीही असले तरी विरोधी पक्षाला मात्र सरकार पडणार असे म्हणावे लागते. सन 1995 मध्ये आमचे 80 आमदार होते तरीही आम्ही विरोधात होतो. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरावे लागते. तेच आत्ता भाजप करते आहे. विरोधकांना कार्यकर्ते सोबत ठेवायचे असतात. त्यासाठी सरकार पडणार असे म्हणावेच लागते. आमदार चलबिचल होवू नयेत, भक्कपणे सरकारवर हल्लाबोल करायाच असतो. कार्यकर्त्यांना गाजर दाखवावे लागते, मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी निर्माण केली आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, तोपर्यंत सरकार मजबूत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत सरकारचे मंत्री स्वप्न पाहत आहे, अशी टिका वारंवार करत आहेत, याबाबत श्री. पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला स्वप्न पडले. आम्ही स्वप्नं पडण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत. अजून नऊ महिने झालं तरी कोरोनावरची लस आली नाही. त्यानंतर अतिवृष्टी आली, त्यानंतर चक्रीवादळ आले. अशा सगळ्यातून मार्ग काढत सरकार स्थीर होते आहे. जगाची स्थिती, देशाची स्थिती कशी आहे,. सर्वाना माहित आहे. तरीही महत्वाच्या विषयावर आम्ही एकत्र आहोत. मात्र भाजपचे खर दुखण वेगळेच आहे, त्यांचे 105 आमदार असतानाही त्यांना सरकार बनवता आले नाही हेच त्यांचे खरे दुखणे आहे. तरीही ते सारख्या काट्या पेटवत आहेत.
‘या’ राज्यातील सर्व शहरात पुन्हा ‘नाईट लॉकडाऊन’; रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू
अजित पवार म्हणाले वीज बिलाच्या संदर्भात अभ्यास सुरू आहे. 59 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. मागील सरकारमुळे महावितरण अडचणीत आले आहे. कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. केंद्र सरकारकडून अध्यापही 29 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे, मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी वारंवार पत्र पाठवूनही पाठवूनही त्याची दखल घेतली गेली नाही. नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभे राहीलेले नाही. दहा वर्षापूर्वी डॉ. मनमोहनसिंह व ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रात होते. त्यावेळी त्यांनी राज्याला त्वरीत मदत जाहीर करून दिलासा दिला होता. त्यांनी देशातील सर्वच राज्यांना समान न्याय दिला होता. मात्र आता केंद्राकडून तसे होताना दिसत नाही.
राज्य सरकारला पूर्व स्थितीत येण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांचे जे काही देणी आहेत. ती त्वरीत द्यावीत. मात्र ते होताना दिसत नाही. केंद्र सरकारने देशातील सर्वाच राज्यांना एक देश म्हणून समान वागणूक दिली पाहिजे, ती सध्या दिसत नाही. आपल्या पक्षाचे सरकार नाही म्हणून निधी देताना भेदभाव होतो आहे. तो देशालाही मारक आहे. नुकसानग्रस्तांना दिवाळीपूर्वी अडीच हजार कोटींचा निधा वाटला आहे. आत्ताही नव्याने मदत पुनर्वसनला दाेन हजार कोटींचा पुढचा हप्ता देण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. तीही मदत दिली जाईल.
तो केंद्रचा अधिकार….
ईडीची कार्यवाही सीआरपीएफच्या जवानांना घेवून सुरू आहे, त्याबाबत श्री. पवार म्हणाले, सीआरपीएपच्या जवानांना घेवून होणारी कार्यवाही त्यांचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने अखत्यारितील एजन्सीचा वापर कसा करायचा त्यांचा प्रश्न आहे. त्यात कारवाई वेळी केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात त्यांचा निर्णय आहे.