पुणे पदवीधर – शिक्षक मतदारसंघ निवडणूक – फलटण येथे आज महाविकास आघाडीचा ‘पदवीधर शिक्षक मेळावा’


 

स्थैर्य, फलटण, दि.२५ : पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड व पुणे शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आज बुधवार, दि.25 रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात ‘पदवीधर शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, जेष्ठ नेते सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), सुभाषराव शिंदे, दिलीपसिंह भोसले, रणजित लाड, सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

फलटण तालुक्यात 59 जणांना कोरोनाची बाधा

तरी फलटण शहरासह फलटण तालुक्यातील महाविकासआघाडी म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, रिपाइं व मित्रपक्ष्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा समन्वयक महेंद्र सूर्यवंशी – बेडके, अच्युतराव खलाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिलींद नेवसे, भिमदेव बुरुंगले, प्रहार जनशक्ती पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटक शंभुराज खलाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, काँग्रेसचे पंकज पवार, अमिरभाई शेख, हेमंत जगताप, सिद्धार्थ दैठणकर, सौ.सुजाता सुनील गायकवाड, पोपटराव काकडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप झणझणे, स्वप्नील मुळीक यांनी केले आहे.

दि.28 पासून रोहन उपळेकर यांचा ‘सत्संगाश्रय’ हा अनोखा उपक्रम


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!