महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (चऊचअ) अध्यक्षपदी दत्तात्रय नाईकनवरे, उपाध्यक्षपदी जितेंद्र ठाकूर तर सचिवपदी अद्वैत चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विनायक शिंदे यांची बहुमताने निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.२४: महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (चऊचअ) अध्यक्षपदी दत्तात्रय नाईकनवरे (सोलापूर), उपाध्यक्षपदी जितेंद्र ठाकूर (जळगाव), सचिवपदी ड. अद्वैत चव्हाण (अमरावती) आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विनायक शिंदे (फलटण, जि. सातारा) यांची लोकशाही पद्धतीने बहुमताने ऑनलाइन निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (चऊचअ) कार्यकारिणी निवडीसाठी ऑनलाईन बैठक घेण्यात आली, त्यामध्ये सर्व सदस्यांनी लोकशाही पद्धतीने आपले मत नोंदवून पदाधिकारी व संघटनेची कार्यकारिणी निवडली आहे.

फलटण तालुक्यात 59 जणांना कोरोनाची बाधा

महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (चऊचअ) अध्यक्षपदी दत्तात्रय नाईकनवरे, उपाध्यक्षपदी जितेंद्र ठाकूर, सचिवपदी अ‍ॅड. अद्वैत चव्हाण, सहसचिवपदी अनुप फंड, कोषाध्यक्षपदी सैफन शेख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विनायक शिंदे, प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. प्रवीण सेलूकर, प्रदेश सचिवपदी गोपाल वाढे यांची आणि महाराष्ट्र राज्य संघटक पदी महादेव हरणे, आनंद भिमटे व महिला प्रतिनिधी कु. श्रुती कथे (निमंत्रित सदस्य) अशी कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने निवडण्यात आली आहे.

सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय, धार्मिक वगैरे कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना संघटनेला महत्व आहे. अलिकडील 3/5 वर्षात डिजिटल मिडियाचे महत्त्व वाढले असून केंद्र सरकार डिजिटल मिडियाला मेनस्ट्रीम मिडिया म्हणून दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील आहे, राष्ट्रपतीनी स्वाक्षरी केली आहे.

पुणे पदवीधर – शिक्षक मतदारसंघ निवडणूक – फलटण येथे आज महाविकास आघाडीचा ‘पदवीधर शिक्षक मेळावा’

डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणार्‍या पत्रकार, प्रतिनिधी व संपादक यांच्या न्याय्य हक्कासाठी काम पाहणार्‍या देशातील पहिल्या असोसिएशन ऑफ डिजिटल मिडिया अँड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (डमिन) संघटनेच्या यशस्वीतेनंतर महाराष्ट्र डिजिटल मिडियाअसोसिएशनची (चऊचअ) स्थापना करण्यात आली आहे. डिजिटल मीडियामधील पत्रकारांना संघटीत करुन त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (चऊचअ) काम करणार आहे. या महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (चऊचअ) संघटनेची महाराष्ट्रात नव्हे तर देशातील पहिली लोकशाही मार्गाने काम करणारी एकमेव संघटना आहे.

कोरोना विषाणू पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन कार्यकारिणी निवड ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली. उपस्थित सर्व सदस्यांनी लोकशाही मार्गाने आपले मत नोंदवून पदाधिकार्‍यांची निवड केली. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून ड अद्वैत चव्हाण यांनी काम पाहिले.

महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (चऊचअ) संघटनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांची नेमणूक करावयाची असून डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणारे पत्रकार, प्रतिनिधी व संपादक यांनी महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन महाराष्ट्र (चऊचअ) अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे 9421075931, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर 9423658181, सचिव ड अद्वैत चव्हाण 9822668786, प्रदेश अध्यक्ष विनायक शिंदे मोबाईल 9503392737, प्रदेश सचिव गोपाल वाढे 8308444934, यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (चऊचअ) संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!