दैनिक स्थैर्य | दि. 07 मे 2024 | फलटण | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकुण 3 लाख 35 हजार 999 मतदारांपैकी 2 लाख 15 हजार 815 मतदारांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. म्हणजेच एकूण 64.23% मतदान झाले असल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
फलटण येथे विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.