दैनिक स्थैर्य | दि. 07 मे 2024 | फलटण | लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे मत फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केले.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न होत आहे. यासाठी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रशासन सज्ज असून प्रशासनाने मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न होण्यासाठी प्रशासनाने अंमलबजावणी केलेली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी फलटण प्रशासन सज्ज आहे; असे मत सुद्धा यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी व्यक्त केले.