फलटणमध्ये दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ७ मे २०२४ | फलटण |
तिसर्‍या टप्प्यासाठी सुरू असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघात दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्याचबरोबर फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनीही मतदान करून लोकशाहीच्या महाउत्सवात सहभाग नोंदविला.

दुसरीकडे माढ्याचे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार व पुन्हा खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर व सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर या दाम्पत्यानेही सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, सकाळच्या सत्रात माढा लोकसभा मतदारसंघात सुमारे २० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले असून कडक उन्हामुळे दुपारच्या सत्रात मतदारांचा मतदानासाठी ओघ कमी झाल्याचे दिसून येत होते.

माढा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात चुरस आहे.


Back to top button
Don`t copy text!