दैनिक स्थैर्य | दि. ९ मे २०२४ | फलटण |
छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती, फलटण तालुका यांच्यावतीने आज, गुरुवार, दि. ९ मे २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंती सोहळ्यानिमित्त फलटणमध्ये आज, गुरुवारी सकाळी ८.३० हाजता भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीचा प्रारंभ श्रीमंत मालोजीराजे पुतळा, माळजाई मंदिरापासून झाला. या बाईक रॅलीत फलटण नगरीतील युवक-युवती, पुरूष-महिला, समस्त शिवप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिवछत्रपतींना नमन करण्यात आले.
आज सायंकाळी ५.३० वाजता भव्य मिरवणूक सोहळा निघणार असून याचा प्रारंभही श्रीमंत मालोजीराजे पुतळा, माळजाई मंदिर, फलटण येथून होणार आहे. या मिरवणूक सोहळ्यात फलटणनगरतील तमाम युवक-युवती, महिला-पुरूष, शिवप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
त्यानंतर रात्री ठीक ११.०० वाजता ‘शिव अभिषेक सोहळा’ होणार असून हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती, फलटण तालुका यांच्यावतीने देण्यात आली.
या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवरायांना नमन करावे, असे आवाहनही जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.