सामाजिक कार्यकर्ते संदीप कर्वे उर्फ टेंप्या यांचे आकस्मिक निधन


दैनिक स्थैर्य | दि. ७ मे २०२४ | फलटण |
फलटणमधील झुंझार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संदीप चंद्रकांत कर्वे (टेंप्या) यांचे आज आकस्मिक दुःखद निधन झाले.

टेंप्या यांच्या निधनाने झुंझार गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून एका चांगल्या कार्यकर्त्याला गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

कर्वे यांना त्यांच्या आप्तेष्टांसह मंडळाचे कार्यकर्ते, मित्रमंडळी व राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!