![]() |
स्थैर्य, फलटण : छत्रपती युवराज संभाजीराजे यांचे सत्कार करताना माऊली सावंत, नरेश सस्ते, यशवंत खलाटे पाटील, पै.शंभूराज बोबडे. |
स्थैर्य, फलटण, दि.२३ : मराठा समाजाचे मार्गदर्शक छत्रपती युवराज संभाजीराजे महाराज हे करमाळा येथे जात असताना फलटण येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना भेट देत विविध विषयांवर चर्चा केली.
सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती युवराज संभाजीराजे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत.खाजगी कार्यक्रमासाठी करमाळा येथे जात असताना निरगुडी ता.फलटण येथे काही वेळ थांबले असता त्यांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशी संवाद साधला या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हे माझे लक्ष असून आम्हाला कोणाचे नुकसान करायचे नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वाटेल ते करू व आरक्षण मिळवून देणारच असे सांगितले.
फलटण शहर व तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यासाठी प्रशासन सज्ज
- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक माऊली सावंत,नरेश सस्ते,मराठा क्रांती मोर्चा चे प्रसिद्धी प्रमुख यशवंत खलाटे पाटील,पै.शंभूराज बोबडे उपस्थित होते.