समर्थ मंदिर परिसरात दुसऱ्या दिवशीही रुंदीकरण मोहीम; पालिकेची धडक कारवाई


सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात रस्ते रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी दुसऱ्या दिवशीही वेग कायम राहिला. पाच जेसीबी आणि इतर यंत्रणांच्या साहाय्याने पालिकेने अतिक्रमण हटविण्याची कारवाई धडाक्यात सुरू ठेवली.

स्थैर्य, सातारा, दि. २६ :  सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात रस्ते रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी दुसऱ्या दिवशीही वेग कायम राहिला. पहाटेपासूनच सातारा नगरपालिकेची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाली होती. पाच जेसीबी, टिपर, ट्रॅक्टर, क्रेन, जनरेटर, अग्निशमन दलाचा बंब तसेच इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई करण्यात आली.

  • अधिकारी व पोलिसांचा फौजफाटा: नगरपालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप चिद्रे, दहिफळे, शहर विकास विभागाचे शैलेश आस्टेकर, गोडसे, अग्निशमन दलाचे अमित निकम, विद्युत विभागाचे अभियंता शिंदे, सावरकर, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम तसेच आरोग्य विभागाचे राकेश गलियल यांच्यासह कर्मचारी सकाळी सात वाजताच परिसरात दाखल झाले होते. कायदोव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव हेही बंदोबस्तासह उपस्थित होते.

  • नागरिकांमध्ये चर्चा:दिवसभर कारवाईचा धडाका सुरू असल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या कारवाईत मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य आणि लाकूड बाहेर काढण्यात आले. हे साहित्य नेमके कुठे नेले जात आहे, याबाबत परिसरात नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती.


Back to top button
Don`t copy text!