नागरिकांनो कोरोनाची पुढची लाट येण्याची शक्यता ; सुरक्षित अंत व मास्क्चा वापर कराच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, दि.२३: वेळीच सजग न झाल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची मोठी शक्यता असल्याचा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगाला आणि विशेषतः युरोपीय देशांना दिला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपीय देशांनी पुरेसे उपाय योजले नाहीत. त्यामुळे युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. 

वृद्ध पित्याकडून मुलाचा खून

डब्ल्यूएचओचे विशेष दूत डेव्हिड नाबरो यांनी स्विस वर्तमानपत्रांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, अजूनही वेळ आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाय योजले पाहिजेत; अन्यथा 2021 च्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. उन्हाळ्यात युरोपीय देशांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या नाहीत. त्यात चुका झाल्या. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप त्यांना पाहायला मिळाला. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अजूनही पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयार राहावे लागेल. 

आशियाई देशांचे कौतुक 

नाबरो म्हणाले, युरोपीय देशांच्या तुलनेत आशियातील देशांनी निर्बंधात सूट दिली नाही. त्यामुळे आशियाई देशांत कोरोनाचा संसर्ग मंदावला. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स हे नियम तिथे पाळले गेले. दक्षिण कोरियाने उत्तम पावले उचचली. स्वित्झर्लंडमध्ये मात्र कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. संक्रमण वाढल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड जाईल.

साताऱ्यात दोन दिवसांत 28 बळी


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!