आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची खासदार उदयनराजेंकडून भेट; आधार देत केले सांत्वन


महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधित गावांमध्ये जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करत ‘मुलगा आणि भाऊ या नात्याने सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहीन’, असा शब्द त्यांनी कुटुंबीयांना दिला.

स्थैर्य, सातारा, दि. २६ : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी तब्बल १२०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत आठ तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.

  • ‘कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी उभा राहीन’:

खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यातील संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांना आधार देताना ते कमालीचे भावुक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही, मात्र मुलगा आणि भाऊ या नात्याने सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.”

या दुर्घटनेबद्दल परिसरातील नागरिकांनीही तीव्र दुःख व्यक्त केले असून, संपूर्ण सातारा जिल्ह्यातून या दिवंगत तरुणांना हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!