जिल्हा पोलीस दलातील कॉन्स्टेबलवर पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


 

स्थैर्य, सातारा, दि.२९: जिल्हा पोलीस दलातील कॉन्स्टेबल अनील वसंत स्वामी यांच्यावर पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रिया अनिल स्वामी (वय २६, रा. सिटी पोलीस लाईन, सध्या रा. झुंजार कॉलनी संचित हॉस्पिटलच्या पाठीमागे गोडोली, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पती अनिल स्वामी हे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असून सध्या त्यांची ड्युटी पोलिस मुख्यालयात आहे. लग्नानंतर जानेवारी २०१३ ते २४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पती अनिल स्वामी यांनी दारू पिऊन वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली तसेच शारीरिक व मानसिक छळ केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!