फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांची नगरपरिषदेला सदिच्छा भेट; नगराध्यक्षांच्या उपस्थितीत सत्कार


फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रम भोसले यांनी फलटण नगरपरिषदेला सदिच्छा भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी भोसले यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. 20 मे : फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रम भोसले यांनी आज फलटण नगरपरिषदेला सदिच्छा भेट दिली. या विशेष भेटीदरम्यान त्यांनी नगरपरिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाची विभागनिहाय सविस्तर माहिती जाणून घेतली.

नगरपरिषदेच्या वतीने विशेष सत्कार:

या सदिच्छा भेटीप्रसंगी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले यांनी सभापती कु. शिवांजली भोसले यांचा नगरपरिषदेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला आणि त्यांना पंचायत समितीतील पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती आणि नगरपरिषद यांच्यातील समन्वयातून शहराच्या व तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती:

या सत्कार समारंभावेळी आणि सदिच्छा भेटीप्रसंगी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखिल जाधव, पंचायत समिती सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक सोमाशेठ जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे, नगरसेवक रोहित नागटिळे, राहुल निंबाळकर, नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा, सौ. मीना काकडे, सौ. सुपर्णा अहिवळे, माजी नगरसेवक अनुप शहा, युवा नेते रणजितसिंह भोसले आणि नगरपरिषदेचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!