फटाके वाजवण्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ 


 

स्थैर्य, सातारा, दि.२९: दारात फटाके न वाजवता जरा लांब वाजवा असे म्हणाल्यावरून झालेल्या वादातून दगडाने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी हणमंत देवीदास तुपे (रा. दत्त कॉलनी म्हसवे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसंत शिंदे, मोना शिंदे (दोघे रा. दत्त कॉलनी म्हसवे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशीा, तक्रारदार व फिर्यादी हे शेजारी राहण्यास असून दि.28 रोजी संशयित हे दारात फटाके वाजवत होते. त्यामुळे तक्रारदारांनी दारापासून लांब फटाके वाजवण्याबाबत संशयितांना सांगितले. त्यामुळे चिडलेल्या संशयितांनी तक्रारदाराला मारहाण करण्यास सुरूवात केली तसेच डोक्‍यात दगड मारून जखमी केले. त्यानंतर तक्रारदार यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल या करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!