
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.२९: मुलांच्या झालेल्या भांडणातून घरात घुसून शांता शरणाप्पा दोडमणी (वय २८, रा. कर्नाटक, सध्या रा. रामकुंड कॉलनी सदर बझार सातारा) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एका दाम्पत्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हनुमंत भोसले व त्यांची पत्नी (रा. कूपर कॉलनी समोर सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शांता दोडमणी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून हनुमंत भोसले व त्यांच्या पत्नीने माझ्या घरात घुसून दांडक्याने हातावर व उजव्या पायावर मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नीने माझ्या आईलाही हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
