

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवरे (ता. फलटण) येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २० मे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (गुणवरे, ता. फलटण) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शैक्षणिक गुणवत्तेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
इयत्ता ५ वी मधील (पूर्व उच्च प्राथमिक) यशस्वी विद्यार्थी:
शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी मध्ये विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले:
-
कु. तृप्ती गौंड
-
कु. अर्णव लंगुटे
-
कु. यशराज चव्हाण
-
कु. मृणाली साळुंखे
-
कु. कैवल्य गरगडे
-
कु. प्रथमेश निकम
-
कु. शिवम पवार
इयत्ता ८ वी मधील (पूर्व माध्यमिक) यशस्वी विद्यार्थी:
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी मध्ये खालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले:
-
कु. रितिका सस्ते
-
कु. प्राजक्ता चव्हाण
-
कु. अथर्व वाघमोडे
-
कु. शिवम घाडगे
-
कु. तनिष्का गावडे
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव:
विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. विशाल पवार सर आणि संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका पवार मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षकवृंद व समन्वयकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच, प्रशालेचे प्राचार्य श्री. किरण भोसले सर, पर्यवेक्षक श्री. राहुल गावडे सर, समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ मॅडम, समन्वयक श्री. सागर बाबर सर व समन्वयक श्री. विजय गावडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाचे विशेष कौतुक केले आहे. या घवघवीत यशामुळे गुणवरे पंचक्रोशीतून आणि फलटण तालुक्यातून यशस्वी विद्यार्थ्यांवर व विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
