स्थैर्य, दि.११: या वित्त वर्षात देशाचा जीडीपी
९.५% कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, दिलासादायक बाब ही की, भारतीय
अर्थव्यवस्थेसाठी सर्वात वाईट काळ गेला आहे. लवकरच वेगवेगळ्या क्षेत्रात
थ्री-स्पीड सुधारणा पाहायला मिळेल. कोरोनाची दुसरी लाट न आल्यास २०२१ पासून
जीडीपी वृद्धी सकारात्मक होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत
दास यांनी शुक्रवारी पतधोरण आढाव्याच्या बैठकीनंतर ही बाब सांगितली.
आढाव्यात आरबीआयने धोरणात्मक दरांत कोणतेही बदल केले नाहीत.
आरबीआयच्या
गव्हर्नरांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेचे लक्ष कोविड-१९ नंतर
पुनरुज्जीवनावर जास्त आहे. नुकत्याच आलेल्या आर्थिक आकड्यांतून आर्थिक
सुधारणेचे संकेत मिळत आहेत. याचे कारण ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि
सणामुळे होणाऱ्या आर्थिक हालचाली हे आहे. सुधारणा आणि सणामुळे मोठ्या
आर्थिक हालचाली आहेत. त्यांनी सांगितले की, धान्य उत्पादन वाढले आहे.
दुसरीकडे अनलॉकमध्ये सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीमुळे निर्मिती कामांत वृद्धी
पाहायला मिळाली आहे. याशिवाय स्थलांतरित मजूरही कामावर परतले आहेत.
याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेतही सुधारणेचे संकेत मिळत आहेत. विक्री आणि
निर्यातीत सुधारणेचे संकेत मिळतात.दास म्हणाले, सुधारणेचे प्रमाण समोर
आहे.मात्र याच्या गतीवर अद्यापही प्रश्न आहे.
रिझर्व्ह कॅपिटल मर्यादा घटली, मोठे गृह कर्ज स्वस्त
रिझर्व्ह
बँकेने प्रिमियम गृह कर्जावर रिझर्व्ह कॅपिटलची मर्यादा ५०% वरून घटून ३५%
केली आहे. यामुळे ७५ लाखापेक्षा जास्तीचे गृह कर्ज स्वस्त होईल. बँक गृह
कर्ज देते तेव्हा काही भांडवल राखीव ठेवावे लागते. ७५ लाखापेक्षा
जास्तीच्या गृह कर्जावर ५०% रिझर्व्ह कॅपिटल ठेवावे लागते. आता ते ३५%
करण्यात आले आहे. बँकांना कमी रक्कम राखीव ठेवावी लागेल.
डिसेंबरपासून २४ तास उपलब्ध राहील आरटीजीएस सुविधा
सध्या
ग्राहकांसाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ वाजेपासून सायं. सहा वाजेपर्यंत
आरटीजीएस सुविधा मिळते. आरटीजीएसच्या (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट)
माध्यमातील व्यवहाराबाबत आरबीआयने मोठा दिलासा देण्याची घोषणा केली आहे.
डिसेंबरपासून या माध्यमाद्वारे फंड ट्रान्स्फरची सुविधा ३६५ दिवस २४ तास
उपलब्ध राहील. यामुळे देशातील व्यावसायिक आणि संस्थांसाठी रिअल टाइम
देवाण-घेवाण वेगवान आणि सुलभ होईल.
आरटीजीएस फंड ट्रान्स्फरची प्रणाली काय आहेे?
–
आरटीजीएस सिस्टिम हायव्हॅल्यू ट्रान्झॅक्शनसाठी असते. याअंतर्गत किमान २
लाख रुपये आणि जास्तीत जास्त कितीही मोठ्या रकमेची देवाण-घेवाण हाेते.
– आरटीजीएसद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर २ तासांत लाभार्थीच्या खात्यात पैसा जमा होतात.
आरबीआयची घोषणा
या वित्त वर्षात जीडीपीत ९.५% घट येण्याची शक्यता
धोरणात्मक दर
रेपो रेट – 4%
बँक दर – 4.25%
कॅश रिझर्व्ह रेशो – 3%
रिव्हर्स रेपो रेट – 3.35%