प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: फलटण आगाराकडून लांब व मध्यम पल्ल्याच्या एसटी बसेसचे वेळापत्रक जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) सातारा विभागांतर्गत येणाऱ्या फलटण आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या एसटी बसेसचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन.

स्थैर्य, फलटण, दि. 4 मे : ‘सुरक्षित प्रवास, आपली सेवा आमचे ध्येय’ हे ब्रीदवाक्य जपत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सातारा विभागांतर्गत येणाऱ्या फलटण आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ला आणि मध्यम लांब पल्ल्याच्या एसटी बस गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या वेळापत्रकाचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

आगाराने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार फलटणवरून सुटणाऱ्या प्रमुख बसेसची वेळ खालीलप्रमाणे आहे:

■ दररोज धावणाऱ्या महत्त्वाच्या व जलद फेऱ्या (शटल सेवा):

  • फलटण ते सातारा: सकाळी ६:०० ते रात्री २०:०० वाजेपर्यंत (दर ४५ मिनिटांनी)

  • फलटण ते बारामती: सकाळी ६:०० ते रात्री २१:४० वाजेपर्यंत (दर २० मिनिटांनी)

  • फलटण ते स्वारगेट (पुणे): सकाळी ६:०० ते रात्री २२:०० वाजेपर्यंत (दर ३० मिनिटांनी)

  • फलटण ते स्वारगेट (विना थांबा): सकाळी ७:०० ते दुपारी १४:०० वाजेपर्यंत (दर ६० मिनिटांनी)


■ लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला बस सेवा (वेळापत्रक):

अ.क्र.मार्ग (कुठून – कुठे)जाण्याची वेळपरतीची वेळ (येताना)
१फलटण ते बोरवलीस. ०६:००दु. १४:००
२फलटण ते बोरवलीदु. १२:१५स. ०५:४५
३फलटण ते बोरवलीदु. १४:००स. ०७:३०
४फलटण ते बोरवलीसायं. १७:३०स. १०:३०
५फलटण ते परेलस. ०६:३०दु. १४:००
६फलटण ते परेलस. ०९:००रात्री २१:३०
७फलटण ते परेलदु. १३:००स. ०५:४५
८फलटण ते परेलरात्री २१:३०स. ०८:१५
९फलटण ते मुंबई सेंट्रलस. ११:३०स. ०८:१५
१०फलटण ते मुंबई सेंट्रलरात्री २२:००रात्री २२:३०
११फलटण ते अक्कलकोटस. ०६:३०दु. १३:००
१२फलटण ते जोतिबास. ०६:३०दु. १४:१५
१३फलटण ते इचलकरंजीस. ०६:३०दु. १४:१५
१४फलटण ते सांगलीस. ०८:००दु. १३:४५
१५फलटण ते सांगलीस. ०८:४५दु. १४:४५
१६फलटण ते लातूरस. ०६:००दु. १३:००
१७फलटण ते लातूरस. ०७:००दु. १४:००
१८फलटण ते लातूरस. १०:००स. ०८:००
१९फलटण ते त्र्यंबकेश्वरस. ०९:००स. ०७:००
२०फलटण ते शिर्डीस. ०५:४५दु. १२:३०
२१फलटण ते शिर्डीदु. १४:००स. ०७:००
२२फलटण ते मलकापूरस. ०७:४५स. ०५:३०
२३फलटण ते मलकापूरस. ०८:४५स. ०६:४५
२४फलटण ते बुलढाणास. ०७:००स. ०५:४५

(टीप: एसटी महामंडळाच्या वरील वेळापत्रकात तांत्रिक कारणामुळे किंवा वाहतूक कोंडीमुळे काही बदल होऊ शकतो.)

☎️ अधिक माहिती व चौकशीसाठी संपर्क:

बसच्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांना काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी फलटण बस स्थानकाच्या चौकशी कक्षाशी ०२१६६ – २२२२२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फलटण आगार व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!