नौदलाच्या शौर्याचे साक्षीदार असलेले सी हॅरिअर विमान बँडस्टँडवर स्थापित


 

स्थैर्य, मुंबई, दि.३: मुंबईच्या पर्यटनात
भर पडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे वाहतूक बेटांचे सुशोभिकरण
करण्यात येत आहे. भारतीय नौदलातर्फे देण्यात आलेले सी हॅरिअर विमान वांद्रे
येथील बँडस्टँडवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बसविण्यात आले असून या
विमानाचे औपचारीकरित्या हस्तांतरण पत्र भारतीय नौदलाचे फ्लॅग ऑफिसर ऑफ
महाराष्ट्र श्रीनिवासन यांच्या हस्ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन,
राजशिष्टाचारमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी वांद्रे येथील
बॅन्डस्टँडवर आयोजित छोटेखानी समारंभात देण्यात आले.

भारतीय नौदलातून निवृत्त झालेले लढाऊ विमान हे मुंबईला भेट म्हणून मिळाले
आहे. मुंबईसाठी ही अनोखी भेट असून यामुळे मुंबईच्या पर्यटन सौंदर्यात आणखी
भर पडणार आहे. हे विमान वांद्रे बॅन्डस्टँड येथील वाहतुक बेटावर ठेवण्यात
आले आहे. भारतीय नौदलाकडून हे विमान औपचारीकरित्या मुंबईला आज प्रदान
करण्यात आले. भारतीय नौदलाकडून निवृत्त झालेल्या आय.एन.एस. विराट
युध्दनौकेवर हे विमान तैनात होते. हे विमान महानगर पालिकेने बॅन्डस्टॅड
येथील वाहतुक बेटावर बसविले आहे. आता सामान्य नागरीकांनाही हे विमान पाहता
येणार आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनाला दरवर्षी या परीसरात शालेय
विद्यार्थ्यांचे संचलन होत असते. त्यामुळे या परीसरात भारतीय सामर्थ्य
दाखविणारे हे विमान ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक आसिफ
झकेरिया, उपायुक्त (परिमंडळ -३) पराग मसुरकर, एच /पश्चिम विभागाचे सहाय्यक
आयुक्त विनायक विसपुते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!