रजनीकांत सक्रिय राजकारणात; ३१ डिसेंबरला पक्षाची घोषणा


 

स्थैर्य, चेन्नई, दि.३: दक्षिणेतील
सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर सक्रिय राजकारणात उतरण्याची अधिकृतरीत्या
घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी गुरुवारी एक ट्विट करत ही घोषणा केली आहे.
मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१
डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले
आहे.

तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक
होणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वारे जोरात वाहत आहेत. त्यातच
गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार
असल्याच्या चर्चांना जोर आला होता. रजनीकांत यांनीही सोमवारी आपल्या रजनी
मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिका-यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज
दुपारी रजनीकांत यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची घोषणा करत
पक्षाच्या घोषणेची तारीखही जाहीर केली आहे.

रजनीकांत हे गेल्या दोन वर्षांपासून तामिळनाडूमधील राजकीय मुद्द्यांवर
सक्रिय झालेले आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी राजकारणामध्ये अधिकृतरीत्या
प्रवेश केलेला नव्हता. गेल्या वर्षी दक्षिणेतील अजून एक सुपरस्टार कमल हसन
यांनी रजनीकांत यांच्यासोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्यानंतर दोघांच्याही पक्षात आघाडी होण्याचे वृत्त समोर आले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!