संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी भाजपकडून सदिच्छा


 

स्थैर्य, पुणे, दि.३: राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्यात महत्वाची भूमिका निभावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत व भाजप यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्हीही बाजूने सोडली जात नाही. परंतु राऊत यांना त्रास जाणवू लागल्याने ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांच्यावर अ‍ॅन्जोप्लास्टी करण्यात येणार आहे. भाजपकडून राऊत हे लवकरात लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या गेल्या आहेत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यांच्या प्रकृतीवर भाष्य केले आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते. उपाध्ये म्हणाले, संजय राऊत हे उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!