फलटणमध्ये गरजवंतांच्या मदतीसाठी ‘माणूसकीची भिंत’; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या हस्ते आज शुभारंभ


 

स्थैर्य, फलटण, दि.२९: गरजवंतांना मदत करण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकत्र येवून फलटण शहरातील महात्मा फुले चौक (खजिना हौदाजवळ) येथे ‘माणूसकीची भिंत’ उपक्रम सुरु करीत असून या उपक्रमाचा शुभारंभ आज रविवार, दिनांक 29 रोजी सकाळी 11:30 वाजता फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या हस्ते होणार आहे. 

उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगण्यात आले की, गोर गरीब लोकांना उपयोगी असा उपक्रम आम्ही सामाजिक भावनेतून आठ दिवसांसाठी सुरू करीत आहोत. घरातील दैनंदिन वापरातील व नको असलेल्या चांगल्या वस्तू गरीबांना देऊन टाकण्याच्या ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास सर्वांनी साथ द्यावी. मोठी माणसे व लहान मुलांचे कपडे, स्वेटर, पादत्राणे, कमरेचे पट्टे, ब्लँकेट, चादरी, सतरंजी व अन्य गृहोपयोगी वस्तू नागरिकांनी याठिकाणी येवून दान कराव्यात आणि गरजू व्यक्तींनी लागणार्‍या वस्तू या ठिकाणावरुन घेवून जाव्यात. 

तरी नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद देवून गरजूंना मदत करावी असे आवाहन नसीर शिकलगार (संपर्क 9860004730), सुभाषराव भांबुरे (संपर्क 9822414030), बाळासाहेब ननवरे (संपर्क 9766214042), ऍड. सचिन शिंदे (संपर्क 9423880111), युवराज पवार (संपर्क 9175341804), उद्धव बोराटे (संपर्क 9822001231), अमित मठपती (संपर्क 9762379771), आमिरभाई शेख (संपर्क 8788945221), सिकंदर डांगे (संपर्क 9175567187), शक्ती भोसले (संपर्क 8177851415), शेखर हेंद्रे (संपर्क 7020816814), अभिजित भोसले(ब्रम्हा हॉटेल) – (संपर्क 9226253565), इम्तियाज तांबोळी (संपर्क 9881452008), प्रितम जगदाळे (संपर्क 8600318181) यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!