• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

चेहर्‍याचा पॅरालीसीस म्हणजे बेल्सपाल्सी; फिजिओथेरपीने पूर्ण बरा होऊ शकतो

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 28, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, फलटण, दि.२९: बेल्स पाल्सी म्हणजे अर्ध्या चेहर्‍यावरून वारे जाणे. या आजारात चेहर्‍याच्या अर्ध्या भागातल्या स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होऊन त्यांचे आकुंचन-प्रसरण थांबते आणि ते लुळे पडतात. क्वचितप्रसंगी चेहर्‍याच्या दोन्ही बाजूंचे स्नायूही या आजारात बाधित होतात.परंतु, या स्नायूंवर तात्पुरता परिणाम होतो, आणि उपचार केल्यावर ते पूर्णपणे बरे होते. 

मेंदूमधून एकूण 12 विशेष मज्जातंतू निघतात. त्यांना क्रेनिअर नर्व्हस म्हणतात. यातील सातव्या क्रमांकाच्या मज्जातंतूंना फेशियल नर्व्ह म्हणतात. मेंदूपासून डोक्याच्या कवटीबाहेर आल्यावर या फेशियल नर्व्हला पाच शाखा फुटतात. त्या कपाळ, भुवया, पापण्या, वरचा आणि खालचा ओठ, गाल, कानाच्या पुढील भाग, मानेचा एका बाजूचा भाग यावरील स्नायूंची हालचाल नियंत्रित करत असतात. या मज्जातंतूला इजा झाल्याने या स्नायूंच्या हालचाली बंद होतात.

 मुख्यचिन्हे आणि लक्षणे- 

* बेल्स पाल्सिमुळे चेहर्‍याचा एका बाजूच्या स्नायूंवर परिणाम होतो. सुमारे 1%लोकांमध्ये दोन्ही बाजूंवर परिणाम होतो. 

* चेहर्‍याच्या हालचाली नियंत्रित करणार्‍या नसांवर परिणाम होतो. ज्या बाजूंवर परिणाम झाला आहे. त्या बाजूने तोंड उघडण्यास, हसण्यास आणि चावण्यास त्रास होतो.

* चेहर्‍याच्या ज्या बाजूवर परिणाम झाला आहे. तिथे दुखू शकतं, मुख्यतः जबडा व डोक्यामध्ये.

* स्नायू अशक्त झाल्यामुळे, डोळ्याच्या पाप्न्याखाली झुकतात आणि तोंडातून लाळ गळते.

* जिभेच्या पुढील भागाने चव ओळखता येत नाही. 

*  चेहर्‍याच्या एका बाजूचे स्नायू लोंबू लागतात, त्यामुळे दोन्ही बाजू असमान दिसतात.

*  चेहरा भावनारहित दिसतो.

*  चेहर्‍यावरचे स्नायू मध्येच आखडतात आणि फडफडतात.

*  खाणे पिणे अशक्य होते.

*  बोलणे स्पष्ट न राहता अडखळत होते.

*  जिभेची चव पूर्णपणे किंवा अर्धवटपणे नष्ट होते.

*  कानामध्ये वेदना होतात.

*  उच्च पट्टीतल्या आवाजाचा त्रास होतो.

*  डोळ्याच्या पापणीची उघडझाप बंद होते.

*  डोळा कोरडा पडतो.

*  आजाराची सुरुवात झाल्यावर ही लक्षणे लगेच दिसू लागतात आणि दोन दिवसांत ती वेगाने वाढतात.

 याची मुख्य कारणे काय आहेत? 

 

* बेल्स पाल्सी 15 ते 60 वर्षांपर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. दर 5000 व्यक्तींत एकाला हा आजार होऊ  शकतो. बेल्स पाल्सी एकदा झाली तरी ती पुन्हा होऊ  शकतो.

* बेल्स पाल्सी होण्याचे खरे कारण वैद्यकीय शास्त्राला स्पष्टपणे माहिती नाही. मात्र काही विषाणूजन्य संसर्गामुळे फेशियल नव्र्हला सूज येते, ती फुगते आणि कवटीच्या ज्या छिद्रातून ती बाहेर येते, त्या हाडामध्ये ती दबली जाते. या दबावामुळे फेशियल नव्र्हचे कार्य थांबते. 

* कानाची किंवा चेहर्‍याची वा त्याच्या आसपासची शस्त्रक्रिया करताना फेशल नार्व्सला इजा पोहोचते तेव्हा देखी बेल्स पाल्सी होण्याची शक्यता असते.  

 या रोगाच काही रिस्क फॅक्टर असे आहेत –

*  मधुमेह

*  गर्भावस्था, विशेषतः शेवटचे तीन महिने.

*  जर कुटुंबात हा रोग आधी कोणाला झाला असेल तर. 

*  चेहर्‍याच्या नसांना झालेल्या कुटलीही दुखापत, सूज किंवा नुकसान यामुये सुधा बेल्स पाल्सी होऊ शकतो.

 निदान आणि उपचार कसे केले जातात? 

बेल्स पाल्सीचे निदान रुग्णाच्या वैद्यकीय तपासणीतूनच होते. रुग्णाची लक्षणे लक्षात आल्यावर डॉक्टर त्याला दोन्ही डोळे घट्ट आवळून घ्यायला सांगतात, त्यामध्ये ज्या बाजूला त्रास झाला आहे, त्या बाजूचा डोळा उघडा राहतो. तपासण्यांमध्ये डॉक्टर रुग्णाला गाल फुगवायला सांगतात, ओठांचा चंबू करायला सांगतात, ओठ फाकवून दात दाखवायला सांगतात, कपाळाला आठया पाडायला सांगतात. या क्रिया करताना रुग्णाच्या चेहर्‍याच्या ज्या बाजूला त्रास झाला आहे, त्या बाजूच्या स्नायूंची हालचाल होत नाही. यावरून बेल्स पाल्सीचे निदान होते.

फेशियल नव्र्हला कितपत इजा झाली आहे, हे पाहण्यासाठी ईएमजी हा मज्जातंतूतील विद्युतप्रवाहाचे मापन करणारा आलेख काढला जातो.

निदान हे शारीरिक तपासणी, इमेजिंग आणि ब्लड टेस्ट द्वारे केले जातात.

* रोगाचे लक्षणं बघून डॉक्टर चेहरा तपासतात, आणि डोळ्यांच्या पापण्या झुकल्या आहेत का, तोंडातून लाळ गळते का हे बघतात.

* एमआरआय किंवा सिटी स्क्यान सारखा इमेजिंग तंत्राच्या सहाय्याने चेहर्‍याचे स्नायू तपासले जातात.

* जर व्हायरल इन्फेक्शन झाल्यासारखे वाटत असेल, तर डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात.

* स्ट्रोक, लाईम रोग आणि ब्रेन ट्युमर सारखे इतर रोग वगळून निदान करण्यात येते.

बेल्स पाल्सी चे उपचार हे रोगाची कारणे आणि रिस्क फॅक्टर वर खूप अवलंबून आहे. 

*  फिजिओथेरपी उपचारामध्ये नर्व्हस्टीमुलेशन आणि लेझर4_क्लास आणि चेहर्‍याच्या ट्यांपिंग उपचाराने आणि योग्य औषधांच्या उपचाराने   शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. 15 दिवस ते एक महिन्यांमध्ये हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. पुन्हा केव्हाही हा आजार न होण्यासाठी फिजिओथेरपी खूप चांगले कार्य करते.   

आम्ही डॉ.अकोलकर यांच्या अथर्व फिजियो थेरेपी क्लिनिकमध्ये तुम्हाला आमच्याकडील कौशल्याचा आणि मशिनरीजचा वापर करून शस्त्रक्रियामुक्त अशी उपचार पद्धती देऊन पुढील काही काळामध्ये तुम्हाला ह्या असहाय्य वेदनानपासून मुक्त करतो.

 डॉक्टरांची वैशिष्टे- 

• डॉ.रोहन अकोलकर हे स्पोर्ट फिजियोथेरेपी मध्ये पीएच.डी. असणारे बारामतीमधील सर्वोत्तम डॉक्टर आहेत. 

• जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणार्‍या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2018 रशिया मध्ये सहभाग घेणारे ते एकमेव भारतीय फिजियोथेरेपीस्ट तज्ञ  डॉक्टर आहेत. 

• डॉक्टरांना असणारा प्रचंड अनुभव त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण.

• अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये असणार्‍या अत्याधुनिक उपकरणे आणि शास्त्रीय  व्यायामाचा वापर करून उपचार केले जातात.

• जर्मनी टेक्नोलॉजीच्या मशीन्स उदा. शोकवेव थेरपी उपचार पद्धती, योग्य परिणामकारक असे उच्च प्रतीचे लेझर उपकरणे ह्या आणि अश्या अनेक अश्या उपकरणांचा उपयोग करून  मणक्यांच्या, पाठीच्या अनेक स्नायू आणि मांसपेशी यांचे दुखणे कायमचे बरे करू शकतो.

 संपर्कासाठी_पत्ता- 

1. डी.एस.ग्रुप., पहिला मजला, आर्यमान हॉटेल च्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.

-ओपीडी वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 पर्यंत.

2.साई बालरुग्णालय, तळ मजला, रिंग रोड (एस.टी.स्टँडच्या पाठीमागे) बारामती. 

ओपीडी वेळ दुपारी 1:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत.

3.संघवी क्लासिक, अ. फ्लॅट नं. 1,  सम्यक लाईफस्टाईल पाठीमागे, भिगवण रोड, बारामती. 

ओपीडी वेळ सायंकाळी 5:30 ते रात्री 8:30 पर्यंत.

मोबाईल नंबर-7350069955.


Tags: आरोग्य विषयकफलटण
Previous Post

PM किसान योजना : ‘या’ तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होईल 7 वा हप्ता, ‘या’ पध्दतीनं तपासा तुमचं यादीमधील नाव, जाणून घ्या

Next Post

जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

Next Post

जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मार्च 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मार्च 27, 2023

गोवा मुक्ती संग्रामच्या प्रत्यक्षदर्शी चंद्राबाई जाधव कालवश

मार्च 27, 2023

एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

मार्च 27, 2023

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

मार्च 27, 2023

सीएलएक्सएनएसचा प्रबळ टीम तयार करण्याचा मनसुबा

मार्च 27, 2023

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

मार्च 27, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकासगट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

मार्च 27, 2023

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मार्च 27, 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्च 27, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!