भाविकांनाे! किन्हई – औंधच्या देवींचा भेटीचा सोहळा रद्द


 

स्थैर्य, गोडोली, (जि. सातारा), दि.२९ : किन्हई (ता. कोरेगाव) येथे साडेतीनशे वर्षांपासून कार्तिक पौर्णिमे दिवशी (यंदा सोमवारी ता. 30) होणारा यमाई भेट सोहळा यावर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. याबराेबरच किन्हईत 15 दिवस भरणारी यात्राही होणार नाही.

औंधच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी, किन्हई यात्रा समिती सदस्य, ग्रामस्थ, देवीचे उपासक, विविध खात्यांतील शासकीय अधिकारी, पोलिसांच्या संयुक्त विचार विनिमयातून हा भेट सोहळ्यासह त्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

कोविड 19 मुळे प्रशासन व संस्थान प्रशासनाला यात्रा भरविणे जोखमीचे असल्याने यात्रा रद्द करणे भाग पडलेले आहे. त्यामुळे यंदा यात्रा काळात कोणतीही उलाढाल होणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार थांबणार आहेत, तर लांबलांबहून येणाऱ्या यमाई भक्तांना यावर्षी भेट सोहळ्यासाठी येता येणार नाही. साडेतीनशे वर्षीत प्रथमच भेट सोहळा होत नसल्याची हुरहुर देवीच्या भक्तांना लागली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!