प्राचार्य डॉ. क्षितीज धुमाळ यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट राष्ट्रीय पुरस्कार


 

स्थैर्य, वडूज, दि.२९: येथील दादासाहेब जोतिराम गोडसे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. क्षितीज यादवराव धुमाळ यांना बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स या संस्थेचा यावर्षीचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम लाईफ टाईम अचिव्हमेंट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व निती आयोगाचे माजी अर्थ सल्लागार डॉ. एच.व्ही.शिवाप्पा यांनी दिली.

अध्यापन, संशोधन, व प्रकाशन या क्षेत्रांसाठी प्रा.डॉ. धुमाळ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा.डॉ. धुमाळ हे गेली २१ वर्षे येथील महाविद्यालयात अदयापनाचे काम करीत आहेत. शिवाय शिवाजी विद्यापीठात हिंदी अभ्यासक मंडळाचे कुलगुरू नियुक्त सदस्य, एम.फील, पीएचडी मार्गदर्शक, तसेच विविध समित्यांचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. देशातील नामांकीत विद्यापीठांच्या पीएचडी प्रबंधांचे परिक्षक, मौखिक परिक्षांचे विषयतज्ञ म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून त्यांचे शोधनिबंधही प्रकाशीत झाले आहेत. त्यांचे संदर्भग्रंथही अनेक विद्यापीठांत अभ्यासक्रमांत समाविष्ट आहेत.

प्रा.डॉ. धुमाळ यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

प्रा.डॉ. धुमाळ यांचे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सचिव व्ही. आर. गोडसे, माजी प्राचार्य सी. आर. गोडसे, प्रशासन अधिकारी आर. एन. घाडगे, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!