महामार्गातील बांधकामे पोलीस बंदोबस्तात पाडण्याचे काम सुरू


दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यात पालखी सोहळा येण्यापूर्वी महामार्गाचे जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार तरडगाव, विडणी, पिंपरद, बरड या भागात मोबदला घेवूनही किंवा वैयक्तिक वादाने मोबदला न उचललेले खातेदार महामार्गातील बांधकामे पाडू देत नव्हते. त्यामुळे महामार्ग पूर्ण करण्यासाठी अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या मदतीने अशी बांधकामे पाडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

दरम्यान, लवकरच फलटण-बारामती मार्गावर जे अडथळे आहेत, त्याबाबतीतही ही कार्यवाही करण्यात येईल, असेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!