फलटण शहराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२४ | फलटण |
फलटण शहराला पाणीपुरवठा होणार्‍या सुधारित जलकेंद्र येथील मेन रायजिंग पाईपलाईनचे क़ाम व सेटलिंग टँक स्वच्छता करण्याचे काम केले जाणार असल्यामुळे फलटण शहरातील पाणीपुरवठा मंगळवार, दि. ४ जून २०२४ रोजी होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली.

मंगळवारी पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे व नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी मोरे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!