पुढील काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, लॉकडाउनवर अजित पवारांची प्रतिक्रिया


 

स्थैर्य, दि.२२: राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर कोरोना संसर्गाचा वेग वाढलेला पाहायला मिळत आहे. यामुळे आता आणखी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनचा होणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

माध्यमांशी बातचीतदरम्यान अजित पवार म्हणाले की, ‘दिवाळीदरम्यान अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली होती. यापूर्वी गणेश चतुर्थीलाही अशीच परिस्थिती होती. सध्या आम्ही संबंधित विभागाशी बोलत आहोत. पुढील 8-10 दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. नागरिक घाबरुन जाण्याचे कारण नाही. राज्य सरकारने एक नियमावली तयार केली आहे, या नियमांचे नागरिकांनी पालन करावे’, असे पवार म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!