
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३० एप्रिल २०२४ | फलटण | आज माढा लोकसभा मतदारसंघासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा स्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी सातारा जिल्हा बँकेचे संचालक तथा फलटण पूर्व भागाचे नेते श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर हे उपस्थित असल्याने श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी फलटणच्या राजे गटाच्या विरोधी भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर हे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या मनोगतात आभार व्यक्त केले.
