
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 30 एप्रिल 2024 | फलटण | काल फलटण येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सभा संपन्न झाली. त्यावेळी धनगर समाजाच्या वतीने त्यांना घोंगडी, काठी व भंडारा देत होते त्यांनी त्यावेळी सदरील मान न घेता धैर्यशील मोहिते – पाटील यांना देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान धनगर समाजाच्या वतीने करण्यात आल्यावर मोदींनी घोंगडी अंगावर घेवूनच आपले भाषण व्यक्त केले. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
