दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणी, छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री, अखंडीतलक्ष्मीअलंकृत वज्रचुडेमंडीत स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाईसाहेब यांची पुण्यतिथी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजगड पायथ्याच्या पाल खुर्द गावी गुंजवणी नदीकिनारी असणार्या त्यांच्या समाधीस्थळावर संपन्न झाली. यावेळी महाराणी सईबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नानासाहेब धुमाळ देशमुख, प्रदीपदादा मरळ देशमुख, हेमंत निंबाळकर, मगदूम सर, महादेवराव माने, तुषार नाईक निंबाळकर, किशोरसिंह नाईक निंबाळकर, पोलीस पाटील योगेश दरडिगे यांची उपस्थिती होती.