दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण | मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य महिलांना गत महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे अनुदान हे थेट खात्यामध्ये जमा होत आहे. या जमा झालेल्या अनुदानांमधून विविध बँका त्यामधून कर्जाचे हप्ते, विविध चार्जेस असे कपात करीत आहेत. याबाबत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत कि; या योजनेच्या अनुदानांमधून बँकांनी कोणतेही चार्जेस, हप्ते कट करू नये. याबाबत फलटण तालुक्यातील माता भगिनींच्या खात्यातून जर पैसे कट केले असतील तर शिवसेनेशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष नानासो उर्फ पिंटू ईवरे यांनी केले आहे.