दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील ललगुण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड व पीक कर्ज याबद्दल माहिती दिली.
ललगुणमधील वि.का.स. सोसायटीमध्ये कृषिदूतांनी भेट दिली व शेतीविषयक कर्ज व पीक कर्ज योजनेबद्दल माहिती घेतली. कृषिदूतांनी कर्जाबद्दल जास्तीत जास्त शेतकर्यांना माहिती सांगितली. सोसायटीचे सचिव व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत कृषिदूतांनी हा कार्यक्रम राबविला.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.