
फलटण तालुक्यातील विडणी, बरड आणि वडले ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी जाहीर केले आहेत. विजयी उमेदवारांची सविस्तर यादी.
स्थैर्य, फलटण, दि. २९ एप्रिल : फलटण तालुक्यातील विडणी, बरड आणि वडले ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, विजयी उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर करण्यात आली आहे. फलटणचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी या विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, ग्रामपंचायतनिहाय विजयी झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
■ विडणी ग्रामपंचायत पोटनिवडणूक – २०२६
वार्ड नं. १ : १) कोकरे भरत रघुनाथ, २) अब्दागिरे दत्तात्रय भिवा
वार्ड नं. २ : जगताप कैलास कोंडीबा
वार्ड नं. ३ : कोल्हे वैशाली शरद
वार्ड नं. ४ : कांबळे सुश्मिता सागर
वार्ड नं. ५ : जगताप सचिन नाथा
वार्ड नं. ६ : गाडे शांताबाई विष्णू
■ बरड ग्रामपंचायत पोटनिवडणूक – २०२६
वार्ड नं. १ : खटके उषा पोपट
■ वडले ग्रामपंचायत पोटनिवडणूक – २०२६
वार्ड नं. ३ : सोनवलकर रणजित मल्हारी
या पोटनिवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे त्यांच्या गावातील ग्रामस्थांकडून आणि परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठ्या उत्साहात अभिनंदन करण्यात येत आहे.
या नव्या सदस्यांच्या निवडीमुळे गावांच्या रखडलेल्या विकासकामांना आता नवी गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

