सुधीर परशुराम साळवी यांची फळसप गाव सरपंच पदी बिनविरोध निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । म्हसळा । रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या फळसप गावात गेल्या ३५ वर्षे बिनविरोध होत आलेल्या निवडणुकीत यंदाही सरपंच पदी बौद्धवाडीतील समाजसेवक सुधीर परशुराम साळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

श्री. सोमजाई जाखमाता सोमेश्वर देवस्थान यांच्या आशीर्वादाने व फळसप गावचे सुपुत्र भास्कर शंकर विचारे (दाजी) यांच्या प्रेरणेने तसेच ग्रामसुधारणा मंडळ, मुंबई अध्यक्ष अजित विचारे, सरचिटणीस राजेश विचारे, देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष विजय विचारे, सरचिटणीस रुपेश विचारे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विश्वनाथ विचारे, बौद्धजन सेवा संघाचे कानू साळवी, हरिश्चंद्र साळवी, यशवंत साळवी, सुरेश साळवी, उदय साळवी, यशोदा कानू साळवी, भगवान साळवी, सुभाष साळवी, राजीव साळवी, जनार्दन साळवी, सिद्धार्थ साळवी, दशरथ साळवी, संजय साळवी, बाबुराव साळवी, रुपेश साळवी, कैलास जाधव यांच्या सहकार्याने सुधीर परशुराम साळवी यांची सरपंच पदी तसेच उपसरपंच श्रीकांत विचारे आणि सदस्य म्हणून वंदना विचारे, स्वाती विचारे, नम्रता विचारे, सीमा राणे व सचिन विचारे यांची बिनविरोध निवड झाली.


Back to top button
Don`t copy text!