‘पदयात्रे’ ऐवजी पक्षाची ‘पडझड’ थांबवा-हेमंत पाटील पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । देशातील मतदारांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतून काँग्रेसला सत्तेतून बेदखल करीत नरेंद्र मोदी यांच्या हाती सुत्रे सोपवली. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेला दारुण पराभव अजूनही काँग्रेस विसरू शकलेली नाही. पंरतु, दरम्यानच्या काळात काँग्रेसचे संघटनात्मक बुरुज ढासळत असल्याचे दिसून आले. अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाचा निरोप घेतला. त्यामुळे पक्षाची वाताहत रोकण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे आहे. पदयात्रा ऐवजी पक्षाची पडझड रोखणे सध्यस्थितीत आवश्यक आहे.पंरतु, असे असताना केवळ सत्तेत परतण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंतची भारत जोडो यात्रासुरू केली असल्याचा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केला.

देशातील १२ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशातून यात्रा करीत काँग्रेस नेते ३ हजार ७५० किलोमीटरची यात्रा करतील. यात्रे दरम्यान काँग्रेस कडून लोकसंपर्कावर विशेष लक्ष दिले जात आहे. पंरतु, हाच लोकसंपर्क सत्तेच्या माध्यमातून आणि विविध लोकोपयोगी योजना राबवून कायम ठेवला असता तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती, असे पाटील म्हणाले. सत्तेत असताना काँग्रेसने मोठमोठे घोटाळे केले. ५० वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगली. परंतु देशाच्या विकास केला नाही. आता काँग्रेसला त्यांनी केलेले विकास कार्य दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात केलेला विकास, केंद्रातील भाजपने महामार्ग, सार्वजनिक क्षेत्र आणि विविध योजनांमधून थेट शेतकर्यांच्या खात्यात निधी जमा केल्याचे दिसून येत आहे. तसा एकही विकास काँग्रेस च्या काळात बघायला मिळाला नाही. त्यामुळे सत्ता परत मिळवण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेली ही यात्रा म्हणजे केवळ थोतांड असल्याचा दावा पाटील यांनी केला. याचा काही एक फायदा नागरिकांना होणार नसल्याचे ते म्हणाले.

पदयात्रे ऐवजी काँग्रेसने आपल्या पक्षाची पडझड रोकावी. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत. गोव्यातील काँग्रेस आमदारांचा गट भाजपमध्ये विलिन झाला आहे. गुलाब नबी आझाद, कपिल सिब्बल सारखे मातब्बर चेहर्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अशा स्थितीत पक्षाची होणारी पडझड हा मोठा प्रश्न पक्षासमोर असताना राहुल गांधी पदयात्रा काढत असल्याने मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पाटील म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!