राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण मार्गदर्शन सुविधा असलेल्या मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड व नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ परसन्स विथ व्हिजुअल डिसेबिलिटीज (दिव्यांगजन), डेहराडून यांच्या वतीने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अदीप योजनेअंतर्गत गरीब व गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना हे स्मार्ट फोन देण्यात आले. कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव आनंद आठलेकर, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम तसेच डेहराडून येथील भूपिंदर राणा उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!