वाई:सोमजाईनगर वाई येथे मुलीचा छेडछाड व केल्या प्रकरणी दोन गटात तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. सोमजाई नगर वाई येथे सोमवारी रात्री वीस वर्षीय मूलगी किराणा दुकानात साहित्य आणायला गेली असता तिच्या ओळखीच्या हृतिक अनिल साठे याने तिची छेड काढत विनयभंग केला. घाबरून तिने आईला घडलेला प्रकार सांगितला.रात्री मुलीचे आईवडील हृतिकच्या घरी समजावण्यास गेले असता मुलाचे वडील अनिल साठे व हृतिक याने आईवडिलांच्या मारहाण केली.मुलीचे आई वडील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी मुलीस आणण्यास सांगितले. त्या युवतीला चुलता, चुलती दुचाकीवरून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आनंदा साठे याने गाडी आडवत पिराजी साठे, प्रकाश साठे,सूरज साठे, सागर वायदंडे यांनी भांडण काढत चुलता चुलतीस शोभा वायदंडे व इतरांनी लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली. मुलीच्या आईवडील व चुलता चुलतीला मारहाण झाल्याचे समजताच मुलीचे नातेवाईक रॉकी निवास घाडगे,अर्जुन किरण घाडगे,कृष्णा निवास घाडगे,सनी निवास घाडगे ,जॉकी निवास घाडगे ,सनी निवास घाडगे,मितवा निवास घाडगे व इतरांनी ऋतिक अनिल साठे याच्या घरात घुसून प्रापंचिक सामानाची मोडतोड करत अनिल साठे,ऋतिक साठे,राजश्री साठे,सागर वायदंडे ,पिराजी साठे व महिलांना जातीवाचक शिवीगाळ करत कोयता,लोखंडी रॉडने जोरदार मारहाण केली.या मारामारीत दोन्ही बाजूकडील अनेक जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत.माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ऋतिक अनिल साठे ( वय १९),सागर गोरख वायदंडे (३९)पिराजी अनंत साठे (३९) रमेश नेमिनाथ गोसावी (४३)मितवा रमेश गोसावी (३६)पल्लवी रमेश गोसावी (२०) सर्व जण राहणार सोमजाई नगर यांना अटक केली असून इतर आरोपी फरारी आहेत.पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधित कायदयानव्ये ( अँट्रासिटी ) गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे करत आहेत.