
स्थैर्य, मुंबई, दि.१५: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर सारा अली खानचेही नाव चर्चेत आले आहे. रिया चक्रवर्तीने एनसीबीच्या अधिका-यांना ड्रग्ज संबंधित बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे सांगितली असून त्यात साराच्या नावाचा उल्लेख असल्याचे म्हटले जात आहे. या चर्चेदरम्यान आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा सुशांत सिंह राजपूतसोबत त्याच्या फार्महाऊसवर स्मोकिंग करताना दिसत आहे. मात्र ही सिगारेट नॉर्मल सिगारेट आहे की ड्रग्जपासून बनलेली आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
हा व्हिडिओ ड्रोनच्या सहाय्याने फार्महाऊसच्या एका स्टाफ मेंबरने बनवल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर साराच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.
‘केदारनाथ’च्या प्रमोशन दरम्यानचा व्हिडिओ
हा व्हिडिओ सुशांत आणि साराच्या ‘केदारनाथ’ (2018) चित्रपटाच्या प्रमोशनच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. चित्रपटाच्या प्रमोशननंतर हे दोघेही लोणावळ्यातील पावना तलावाच्या काठावर असलेल्या या फार्महाऊसवर येत असत.
फार्महाऊसचा केअरटेकर राहिलेल्या रईसने एका बातचीतमध्ये सांगितले होते, “साराने 2018 मध्ये सुशांत सरांसोबत फार्महाऊसवर येणे सुरु केले होते. हे दोघे येथे आल्यानंतर दोन ते तीन दिवस एकत्र राहायचे. डिसेंबर 2018 मध्ये थायलंड ट्रीपहून परतल्यानंतर सुशांत आणि सारा एअरपोर्टहून थेट फार्महाऊसवर आले होते. त्यावेळी रात्रीचे 10 किंवा 11 वाजले असावेत. त्यावेळी दोघांसोबत त्यांचे काही मित्रही येथे आले होते.”
रियाने एनसीबीसमोर साराचे नाव घेतले?
रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्तीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (एनसीबी) दिलेल्या 20 पानी जबाबात 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे उघड केली आहेत. सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांनी ड्रग्ज घेतल्याची कबुली तिने दिली आहे.
रियाने सुशांतची मैत्रीण आणि माजी मॅनेजर रोहिणी अय्यर हिचेही नाव घेतले आहे. मात्र काही रिपोर्ट्सनुसार, एनसीबीने हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही बॉलिवूड सेलेब्सचे नाव रियाने त्यांच्यासमोर घेतलेले नाही.
फार्महाऊसमध्ये ड्रग्ज संबंधित सामान सापडले
सोमवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतच्या फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी त्यांना औषधे, एशट्रे आणि हुक्का यासारख्या वस्तू आढळल्या. या वस्तूंचा वापर ड्रग्ज घेण्यासाठी केला जातो.
वृत्तानुसार सुशांत येथे रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा आणि इतरांसह पार्टी करत असे. सुशांत नैराश्येत होता तेव्हासुद्धा येथे पार्टी होत असे. सुशांतने हे फार्महाऊस भाड्याने घेतले होते आणि त्यासाठी दरमहा अडीच ते तीन लाख रुपये तो द्यायचा.