रिलायंसमध्ये गुंतवणूक सुरुच : कार्लाइल ग्रुप रिलायंस रिटेलमध्ये करणार 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, यापूर्वी सिल्वर लेकने 7 हजार 500 कोटी गुंतवले आहेत


स्थैर्य, दि.१५: कार्लाइल ग्रुप भारतातील रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) मध्ये भागीदारी विकत घेऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन कंपनी कार्लाइल रिलायंस रिटेलमध्ये 2 बिलियन डॉलर (14.69 हजार कोटी रुपये)ची गुंवणूक करण्याच्या विचारात आहे. यापूर्वी सिल्वर लेक या कंपनीने रिलायंस रिटेलमध्ये 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

रिपोर्ट्सनुसार कार्लाइल ग्रुपची रिटेल क्षेत्रातील ही पहिलीच गुंतवणूक आहे. भारतीय रिटेल सेक्टरमध्ये 2 बिलियन डॉलरची गुंतवणूक या क्षेत्रातील सर्वात मोठी गंतवणूक ठरू शकते. अमेरिकन कंपनी भारतात ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या योजनेवर काम करत आहे. यात रिलायंस रिटेल वेंसर्स लिमिटेडमधील गुंतवणुही सामील आहे. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या या गुंतवणुकीबाबत चर्चा सुरू आहेत.

सिल्वर लेकने केली 7,500 कोटींची गुंतवणूक

अमेरिकेतील दुसरी एक कंपनी सिल्वर लेक पार्टनर्सने मागच्या आठवड्यात रिलायंस रिटेलमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली होती. सिल्वर लेक रिलायंस रिटेलमधील 1.75% भागीदारीसाठी 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वीही सिल्वर लेकने रिलायंस जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार रिलायंस रिटेल वेंचर्समध्ये केकेआर अँड कंपनी ( KKR and Co.), मुबाडाला इन्वेस्टमेंट कंपनी आणि अबु धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटीकडून 5 बिलियन डॉलर (36.66 हजार कोटी रुपये)गुंतवणूक केली जाऊ शकते. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेडने 2020 मध्ये रिटेल मार्केटवर चांगली पकड मिळवली आहे. सध्या भारतात रिलायंस रिटेलचे 12 हजार स्टोअर्स आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!