फलटणमध्ये ‘अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थे’तर्फे ३ मे रोजी सामुदायिक उपनयन (व्रतबंध) संस्काराचे आयोजन; नावनोंदणीचे आवाहन


अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), केंद्र फलटण यांच्या वतीने रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी फलटणमध्ये सामुदायिक उपनयन (व्रतबंध/मुंज) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी त्वरित नावनोंदणी करावी.

स्थैर्य, फलटण, दि. 15 एप्रिल : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), केंद्र फलटण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘सामुदायिक उपनयन (व्रतबंध/मुंज) संस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सलग २४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या संस्थेचा यंदाचा हा सामुदायिक मुंज सोहळा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी फलटणमध्ये मोठ्या उत्साहात व शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार आहे.

सातारा जिल्ह्यातील एकमेव व अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘फलटण केंद्रा’तर्फे आपल्या मुलाचा व्रतबंध सोहळा अत्यंत विधिवत आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यासाठी पालकांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

वेळ आणि स्थळ:

  • दिनांक: रविवार, दि. ३ मे २०२६

  • शुभ मुहूर्त: सकाळी ११.०८ वाजता

  • स्थळ: महाराजा मंगल कार्यालय, रिंग रोड, लक्ष्मीनगर, फलटण.

सोहळ्याचे स्वरूप, शुल्क व सुविधा:

या सामुदायिक उपनयन संस्कारासाठी प्रति बटू रु. ५०००/- इतके नाममात्र शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये अनेक सोयी-सुविधांचा समावेश आहे:

  • बटू आणि त्याचे आई-वडील यांच्यासह १० व्यक्तींचा नाश्ता आणि भोजनाचा खर्च यात समाविष्ट आहे.

  • ब्राह्मण दक्षिणा आणि भव्य भिक्षावळ (मिरवणूक) इत्यादी सर्व खर्च संस्थेकडूनच केला जाईल.

  • (१० व्यक्तींपेक्षा जास्त नातेवाईक असल्यास प्रति व्यक्ती रु. २००/- अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, ज्यामध्ये त्यांच्या नाश्ता व भोजनाचा समावेश असेल).

  • वेदशास्त्र संपन्न गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडतील.

या सोहळ्याची प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. सुसज्ज व मोठी क्षमता असलेले ‘महाराजा मंगल कार्यालय’.
  2. सर्व बटूंची शहरातून निघणारी भव्य भिक्षावळ.
  3. सलग २४ वर्षांची उज्ज्वल आणि यशस्वी परंपरा.
  4. सर्व सोहळा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि वेळेत करण्याची शिस्तबद्ध परंपरा.

नावनोंदणीसाठी संपर्क:

मुंजीची नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे. तरी आपली मुंज त्वरित निश्चित करण्यासाठी इच्छुकांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:

  • श्री. भालचंद्र ताथवडकर (केंद्र प्रमुख) – ९४२१८८१५६३

  • श्री. नंदकुमार केसकर (उप-केंद्र प्रमुख) – ९६६५१६०५२५

  • श्री. वैभव विष्णुपद (कार्याध्यक्ष) – ९८५०५१९५९७

  • श्री. वामनराव कुलकर्णी (खजिनदार) – ७३७८६८३११६


Back to top button
Don`t copy text!