फलटण: बकुळ पराडकर यांच्या स्मरणार्थ शोकसभा – मान्यवरांची उपस्थिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

साहित्य व मुद्रण तज्ज्ञ बकुळ पराडकर यांच्या निधनानिमित्त फलटण शहरामध्ये रविवार २६ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २४ जुलै : साहित्य, संगीत आणि मुद्रण क्षेत्रातील तज्ज्ञ ब्रह्मानंद ऊर्फ बकुळ पराडकर यांचे २० जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ विविध संस्था आणि मित्र परिवाराच्या वतीने रविवार, २६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही शोकसभा लक्ष्मीनगर येथील महाराजा मंगल कार्यालयात होणार आहे. फलटण पत्रकार संघ, ब्राह्मण संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, अभाविप, संस्कार भारती आणि अनुबंधकला मंडळ यांसह विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी या सभेचे आयोजन केले आहे.

या शोकसभेसाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले, अरविंद निकम, प्रसाद जोशी, माजी प्राचार्य देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पराडकर यांचा मित्र परिवार उपस्थित राहणार आहे. सर्वांनी या शोकसभेस उपस्थित राहून आदरांजली वाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!