
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २४ जुलै २०२६ | फलटण | महाराष्ट्र शासनाच्या जनसुविधा विशेष अनुदान सन २०२५-२६ योजनेतून घाडगेमळा (ता. फलटण) गावातील अंतर्गत रस्त्याचे कामाचे भूमिपूजन युवा नेते तथा पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांतून ४,१०,८३० रुपये खर्चाचे हे काम मंजूर झाले आहे.
या भूमिपूजनास शशिकांत घाडगे, आंनदा घाडगे, दशरथ घाडगे, नवनाथ घाडगे, जगन्नाथ घाडगे, उत्तम घाडगे, अरविंद घाडगे, वसंत घाडगे, महादेव घाडगे, केतन घाडगे, महेंद्र घाडगे, रवींद्र ढोले, बापू ढोले, बापू घाडगे, बाळासाहेब ढोले, अजित घाडगे, शंकर घाडगे, सौरभ घाडगे, गोरख घाडगे, भागवत घाडगे, बाबू घाडगे उपस्थित होते.
