फलटणमधील ‘श्री सद्गुरू हरिबुवा महाराज पतसंस्थेत’ मेगा भरती; आकर्षक पगार!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण येथील नामांकित ‘श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सह. पतसंस्था मर्या.’ यांच्या प्रधान कार्यालयात विविध पदांची तातडीने भरती करावयाची आहे. बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता:

  1. मॅनेजर – २ जागा (पात्रता: बी. कॉम / एम. कॉम / एम.बी.ए / जी.डी.सी. अँड ए.)

  2. अकौंटंट – २ जागा (पात्रता: बी. कॉम / एम. कॉम)

  3. क्लार्क – ४ जागा (पात्रता: बी. कॉम / एम. कॉम)

  4. वसुली अधिकारी – १ जागा (पात्रता: बी. कॉम / एम. कॉम / कोणतीही पदवी)

  5. ड्रायव्हर – २ जागा (पात्रता: १२ वी पास आणि LMV लायसन्स)

  6. शिपाई – १ जागा (पात्रता: १२ वी पास)

महत्त्वाची माहिती आणि अटी:

  • अनुभव: संबंधित कामाचा व बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

  • पगार: पात्र उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाईल.

  • टीप: वरील सर्व पदांसाठी फक्त पुरुष उमेदवारांनीच अर्ज करावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ५ दिवसांच्या आत ‘मा. चेअरमन सो.’ यांच्या नावे आपला अर्ज पाठवावा. अर्जासोबत मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित (Attested) प्रती जोडणे अनिवार्य आहे.

📍 पत्ता: श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सह. पतसंस्था, महाराजा आयकॉन (जुने गणेश मंगल कार्यालय), लक्ष्मी नगर, फलटण.

📧 ईमेल: haribuwa_path@yahoo.in

📞 फोन नंबर: 9822609209

24072026

Back to top button
Don`t copy text!