रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; जयंतीनिमित्त पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत याप्रसंगी नागरिकांना पाणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. १५ एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण’ यांच्या वतीने महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या आणि चैतन्याच्या वातावरणात पार पडला.

केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत, संस्थेच्या वतीने जयंतीनिमित्त उपस्थित नागरिकांना व अनुयायांना पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. सध्याच्या वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेने राबवलेल्या या ‘जलदान’ उपक्रमाचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे.

या अभिवादन व पाणी वाटप कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. इम्रान सिकंदर सय्यद, खजिनदार श्री. अतुल शाह, श्री. कैफ शेख, तसेच संस्थेच्या संचालिका श्रीमती शाहीन शेख, सौ. रझिया शेख, सौ. माया बनसोडे, सौ. अनिसा सय्यद, सौ. प्रीती शाह, सौ. हिना सय्यद आणि सौ. मंगल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी ‘पत्रकार परिषद’, ‘डिजिटल मीडिया परिषद’ आणि ‘भारतीय बौद्ध महासभा’ या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक-संचालिका व इतर सभासदही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मोलाच्या सहकार्याने हा प्रबोधनात्मक आणि सामाजिक उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

Back to top button
Don`t copy text!