
स्थैर्य, फलटण, दि. ५ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणूक २०२५ जाहीर झाली असून, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम फलटण – पंढरपूर रोडवरील गोविंद मिल्क येथे जाहीर करण्यात आला आहे.
हा मुलाखतींचा कार्यक्रम गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर आणि शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर असा दोन दिवस चालणार आहे.
गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुलाखतींमध्ये सकाळी प्रभाग क्रमांक १ (वेळ १० ते ११), प्रभाग क्रमांक २ (वेळ ११ ते १२) आणि प्रभाग क्रमांक ३ (वेळ १२ ते १) यांचा समावेश आहे.
त्याच दिवशी सायंकाळी प्रभाग क्रमांक ४ (वेळ ६ ते ७), प्रभाग क्रमांक ५ (वेळ ६ ते ७) आणि प्रभाग क्रमांक ६ (वेळ ७ ते ८) साठी मुलाखती होतील.
शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात प्रभाग क्रमांक ७ (वेळ १० ते ११), प्रभाग क्रमांक ८ (वेळ ११ ते १२), प्रभाग क्रमांक ९ (वेळ १२ ते १) आणि प्रभाग क्रमांक १० (वेळ १ ते २) यांच्या मुलाखती घेतल्या जातील.
त्याच दिवशी सायंकाळच्या सत्रात प्रभाग क्रमांक ११ (वेळ ६ ते ७), प्रभाग क्रमांक १२ (वेळ ७ ते ८) आणि प्रभाग क्रमांक १३ (वेळ ८ ते ९) साठी मुलाखतींचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
राजे गटाच्या सर्व इच्छुक सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या समर्थकांसह या मुलाखतींना उपस्थित राहावे, असे आवाहन राजे गटाच्या वतीने करण्यात आले आहे.
