
स्थैर्य, फलटण, दि. ५ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणूक २०२५ जाहीर झाली असून, या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विंचुर्णी फार्म हाऊस येथे होणार आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या अनुषंगाने होणाऱ्या बैठकीला महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी केले आहे.
